पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १४ फेब्रुवारी २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -  कौटुंबीक समस्येमुळे मन निराश होईल. आईचं सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती असेल. मान- सन्मानात वाढ होईल. वडिलांचं सहकार्य लाभेल. मेहनत अधिक घ्यावी लागेल. 

वृषभ -  आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. स्वत:वर संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा, नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. कुटुंबापासून दूर जावं लागेल पण त्याचबरोबर मेहनत अधिक घ्यावी लागेल.

मिथुन - आत्मविश्वास भरपूर जाणवेल. मन शांत आणि प्रसन्न राहिल. अनेक कठीण प्रसंगाना सामोरं जावं लागेल. जुन्या मित्राची भेट होईल. मित्रांसोबत पर्यटनास जाण्याचा योग येईल. उत्पन्नात वाढ होईल.  

कर्क - धैर्याची कमी जाणवेल. भावना नियंत्रणात ठेवा. कुटुंबाची साथ मिळेल. अनियोजित खर्चात वाढ होईल. मानसिक तणाव जाणवेल. कौटुंबीक समस्येमुळे मन चिंतेत राहिल. खर्चात वाढ होईल.

सिंह - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. आशा-निराशा मिश्रित दिवस असेल. स्वभाव चिडचिडा राहिल. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. आरोग्याची  काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा.  

कन्या - पाठ- पठनात रुची वाढेल. मानसिक शांती लाभेल.   मान- सन्मान मिळेल. मात्र आरोग्याची काळजी घ्या.  आत्मविश्वासाची कमी जाणवेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.  खर्चात वाढ होईल. 

तूळ - आशा- निराशा मिश्रित भाव राहतील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. स्वभाव चिडचिडा राहिल. नोकरीत प्रगतीची संधी प्राप्त होईल.  कला आणि संगितात रुची वाढेल. नोकरीत अधिकाऱ्याचं सहकार्य लाभेल. परिश्रम अधिक घ्यावे लागतील.

वृश्चिक - मन अशांत राहिल. स्वभाव हट्टी राहिल. स्वत:वर संयम ठेवा. कौटुंबीक समस्येमुळे मन अशांत राहिल. शहराबाहेर जाण्याचे योग आहेत. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. राहणीमान कष्टदायक होईल. 

धनू - कुटुंबात मतभेदाची शक्यता आहे. मानसिक शांती राहिल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. वडिलांचं सहकार्य लाभेल. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर येईल. आईला आरोग्याची समस्या जाणवेल. 

मकर - मानसिक तणाव  जाणवेल. भावनांना आवर घाला. रागाचा अतिरेक टाळा. खर्चात वाढ होईल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी यात्रेला जाण्याचा योग येईल. 

कुंभ - आत्मविश्वासाची कमी जाणवेल मन अशांत राहिल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. खर्चामुळे मन चिंतेत राहिल. शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम मिळतील. 

मीन - भावंडांचं सहकार्य लाभेल.  मन अशांत राहिल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळेल. मित्राचं सहकार्य लाभेल. घरातील चिंतेनं मन ग्रासेल. मित्रांसोबत पर्यटनाला जाण्याचा योग्य येईल.

पं. राघवेंद्र शर्मा