पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १३ डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - आशा-निराशा असे भाव मनात राहतील. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. घरात धार्मिक कार्य होतील. कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते.  

वृषभ - बोलण्यात सौम्यता राहिल. आत्मसंयम ठेवा. आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील. 

मिथुन - मानसिक शांती राहिल. एखाद्या अज्ञात भितीने चिंतेत रहाल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. कुटुंबात परस्पर मतभेद वाढू शकतात. 

कर्क - आत्मविश्वास कमी होईल. कौटुंबिक समस्या वाढू शकतात. खर्च वाढेल. आत्मसंयम ठेवा. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

सिंह - एखाद्या मित्राच्या मदतीने नोकरीची संधी मिळू शकते. वाहन सुखात वाढ होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. भावानांना नियंत्रणात ठेवा. 

कन्या - कामात उत्साह राहिल. अधिक कष्ट करावे लागतील. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. वाचनात रस वाढेल. खर्च वाढेल. 

तूळ - मन अशांत राहिल. कार्यक्षेत्रात सुधारणा होईल. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होतील. अतिरिक्त जबाबदारी मिळेल. आत्मविश्वास राहिल. उत्पन्न वाढेल. 

धनू - शैक्षणिक कार्यात मन लागेल. नोकरीत अडचणी वाढतील. शैक्षणिक कार्यात अडचणींचा सामना करावा लागेल. उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील. 

मकर - मानसिक असंतोष राहिल. रागाचा अतिरेक टाळा. अनियोजित खर्चात वाढ होईल. मुलांना त्रास होईल. उत्पन्न वाढेल. 

कुंभ - मानसिक शांती मिळेल. शैक्षणिक आणि बौध्दिक कार्यात यश मिळेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. 

मीन - कुटुंबात मान-सन्मान मिळेल. वाहन सुखात वाढ होईल. मनात सकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. 

पं. राघवेंद्र शर्मा