पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | ९ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - धैर्यशीलपणा कमी होईल. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. जीवनसाथीशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

वृषभ - मानसिक शांतता राहिल. धैर्यशीलता वाढेल. जीवनसाथीला एखादा स्वास्थ विकार होऊ शकतो. खर्च अधिक होईल.

मिथुन - आईशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. अधिक राग येऊ शकतो. नोकरीमध्ये कार्यभारात वाढ होईल.

कर्क - मनात आशा आणि निराशेचे भाव राहतील. नोकरीमध्ये स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल.

सिंह - एखाद्या मित्राच्या सहकार्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पण नोकरीसाठी एखाद्या दुसऱ्या शहरात जावे लागू शकते. 

कन्या - एखाद्या जुन्या मित्राचे आगमन होईल. नोकरीमध्ये अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. 

तूळ - उत्पन्नात वाढ होईल. परिवाराची जबाबदारी वाढू शकते. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. राहणीमानात बदल होईल.

वृश्चिक - नोकरीमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. बढतीचे योगही आहेत. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जावे लागू शकते. उत्पन्नात वाढ होईल.

धनू - मन अशांत राहिल. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकते. बहिणींचे सहकार्य मिळेल.

मकर - संतती सुखात वाढ होईल. जीवनसाथीला स्वास्थ विकार होऊ शकतात. आईचे सहकार्य मिळेल. खर्च अधिक होईल.

कुंभ - समोरच्याशी जपून बोलाल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. वाहनाच्या देखभालीवरील खर्च वाढेल. 

मीन - आशा-निराशेचे समिश्र भाव मनात राहतील. धर्माप्रती श्रद्धाभाव राहिल. पैसे मिळवण्यात अडचणी येतील. खर्च अधिक होईल.

पं. राघवेंद्र शर्मा