पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | ८ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत. यात्रा कष्टप्रद होऊ शकते. आईला एखाद आजार होऊ शकतो.

वृषभ - भावा-बहिणींच्या मदतीमुळे व्यवसायात सुधारणा होऊ शकते. फायदा होण्याची शक्यता. खर्चही वाढणार

मिथुन - मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. बोलताना संयम बाळगा. जीवनसाथीला एखादा आजार होऊ शकतो.

कर्क - आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. संततीकडून एखादी गोड बातमी ऐकायला मिळू शकते.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. अधिक परिश्रम करावे लागतील. कौटुंबिक सुखात वाढ होईल.

कन्या - मानसिक शांतता राहिल. मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. भावाबरोबर वैचारिक मतभेद होऊ शकतात.

तूळ - राग किंवा संताप येण्याची शक्यता. कुटुंबात अतर्गत मतभेद वाढतील. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक - अध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कामात मानसन्मान मिळेल. सरकारचे सहकार्य मिळेल. 

धनू - जीवनसाथीला स्वास्थ विकार होऊ शकतो. मनात अशांतता राहिल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

मकर - कपड्यांबद्दल प्रेम वाढेल. बोलताना काळजी घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. यात्रा फायदेशीर होऊ शकते. 

कुंभ - आत्मसंयम बाळगा. रागाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांच्या साह्याने धनप्राप्ती होऊ शकते. उत्पन्नात वाढ होईल.

मीन - मानसिक शांतता राहिल. संततीच्या आरोग्यात सुधारणा होईल. दैनंदिन जीवनात अडचणी येण्याची शक्यता. यात्रेवर जाण्याचे योग.

पं. राघवेंद्र शर्मा