पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शनिवार | ६ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - चिडचिडेपणा राहिल. आईला एखादा आजार होऊ शकतो. राहणीमान काहीसे कष्टप्रद असेल. नोकरीमध्ये बदली होण्याची शक्यता.

वृषभ - अचानक पैसे मिळण्याचे योग. एखाद्याकडून येणारी जुनी येणी वसुल होतील. धैर्य दाखवण्याची क्षमता कमी होईल.

मिथुन - एखाद्या अनाहूत भितीमुळे चिंताग्रस्त राहाल. कौटुंबिक समस्यांमध्ये सुधारणा होईल. कुटुंबात मान-सन्मान वाढेल.

कर्क - मनात शांतता ठेवा. रागाचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. अधिक परिश्रम करावे लागतील.

सिंह - धैर्य दाखवण्याची क्षमता कमी होईल. नवे कपडे खरेदी करण्याकडे कल असेल. उत्पन्न वाढेल. शैक्षणिक कार्यांमध्ये यश मिळेल.

कन्या - मनात अशांतता राहिल. मानसिक तणावही राहू शकतो. घरगुती सुखात वाढ होऊ शकते. वडिलांना एखादा आजार होऊ शकतो.

तूळ - शैक्षणिक कार्यांमध्ये यश मिळेल. एखाद्या मित्राच्या सहकार्यामुळे कामकाजाच्या संधी मिळू शकतात.

वृश्चिक - मानसिक शांतता लाभेल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होण्याचा अंदाज.

धनू - अभ्यासात रुची वाढेल. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात चांगले परिणाम दिसू शकतात. कुटुंबात धार्मिक कार्य होतील.

मकर - आत्मविश्वास कमी राहिल. अनियोजित खर्च वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील.

कुंभ - नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. बढतीचे योग आहेत. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक सुख कमी होण्याचा अंदाज.

मीन - आत्मविश्वास दुणावेल. आईला आजार होण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात अधिक श्रम घ्यावे लागण्याची शक्यता.

पं. राघवेंद्र शर्मा