पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | 3 एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - शैक्षणिक कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात वृद्धी होऊ शकेल. फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल.

वृषभ - धैर्यशीलता कमी होईल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. एखाद्या मित्राच्या सहकार्यामुळे नोकरीचा योग येऊ शकतो.

मिथुन - आत्मविश्वास दुणावेल. कौटुंबिक समस्या कमी होतील. आरोग्यावरील खर्च वाढेल. राहणीमानात बदल होऊ शकेल.

कर्क - मन अशांत राहिल. मानसिक तणावाचाही मुकाबला करावा लागेल. आरोग्य सांभाळा. मित्रांचे सहकार्य मिळेल. खर्चात वाढ होईल.

सिंह - नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. संचित संपत्तीमध्ये घट होऊ शकेल.

कन्या - आत्मविश्वास कमी राहिल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आईचे सहकार्य मिळेल. गोड खाण्याची इच्छा होईल.

तूळ - उत्पन्न कमी आणि खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात अनुकूल स्थिती राहिल. तब्येत सांभाळा.

वृश्चिक - पाठांतराची आवड वाढेल. वडिलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. राहणीमान बदल होईल. संततीला त्रास होऊ शकतो.

धनू - नोकरीमध्ये बदल घडण्याची शक्यता. वरिष्ठ पद मिळण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात अनुकूल स्थिती राहिल.

मकर - समोरच्याशी सौम्यपणे बोलाल. कला आणि संगीत विषयातील रुची वाढेल. एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क होऊ शकेल.

कुंभ - आत्मविश्वास कायम राहिल. मानसिक शांतता लाभेल. आईचे सानिध्य लाभेल. उत्पन्न वाढीचे स्रोत वाढू शकतील.

मीन - राहणीमानात अस्ताव्यस्तपणा असेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. बढती मिळण्याची शक्यता. कामामध्ये वाढ होईल.