पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | २३ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - मन अशांत राहिल. कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

वृषभ - जप-तपामध्ये रुची वाढेल. लेखन आणि बौद्धिक कामात मान-सन्मान मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होईल.

मिथुन - मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. मित्रांशी मतभेद वाढू शकतात. निरर्थक वादविवादांपासून दूर राहा.

कर्क - क्षणात आनंदी तर क्षणात दुःखी भाव मनात राहतील. मनात निराशा आणि असंतोषाचे भावही राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च अधिक होईल.

सिंह - मान-सन्मान वाढेल. नोकरीसाठी दिलेल्या स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

कन्या - मनात निराशा आणि असंतोष राहिल. धर्म-कर्मामध्ये रुची वाढेल. कौटुंबिक जीवन सुखी राहिल. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा.

तूळ - धैर्यशीलपणा कमी होईल. वाणीमध्ये सौम्यता राहिल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने धनप्राप्तीचे योग आहेत.

वृश्चिक - आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात प्रवास करण्याचे योग आहेत.

धनू - खूप आळस येईल. आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत.

मकर - अधिक खर्च झाल्याने चिंतीत राहाल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. अनियोजित खर्च वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कुंभ - कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. अधिक कष्ट करावे लागतील. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू शकतो.

मीन - आत्मविश्वास वाढेल. मनात नकारात्मक विचार वाढू शकतात. कला आणि संगीत याची आवड वाढेल.

पं. राघवेंद्र शर्मा