पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | सोमवार | २२ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - धैर्यशीलपणा कमी होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जीवनसाथीला एखादा आजार होऊ शकतो.

वृषभ - क्षणांत आनंदी क्षणात दुःखी भाव राहतील. कुटुंबाच्या समस्या त्रस्त करू शकतात. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.

मिथुन - आशा-निराशेचे समिश्र भाव मनात राहतील. तब्येत सांभाळा. उत्पन्न मिळवण्यात अडचणी येतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

कर्क - मानसिक शांतता राहिल. बोलताना सांभाळा. धार्मिक संगीत ऐकायला आवडेल. वाहनसुखात वाढ होईल.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. धैर्यशीलपणा कमी होईल. वडिलांना स्वास्थ विकार होऊ शकतो.

कन्या - आत्मविश्वास कमी होईल. भावा-बहिणींच्या सहकार्याने व्यवसायात सुधारणा होऊ शकते. फायदा मिळण्याची संधी वाढेल.

तूळ - वाणीमध्ये सौम्यता ठेवा. मनात अशांतता राहिल. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम मिळू शकतात.

वृश्चिक - क्षणात आनंदी आणि क्षणात दुःखी भाव मनात राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वडिलांना एखादा आजार होऊ शकतो. खर्च अधिक होईल.

धनू - आत्मविश्वास वाढेल. मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. तब्येतीची काळजी घ्या.

मकर - कुटुंबाता धार्मिक कार्य होऊ शकतात. मालमत्ता सांभाळण्यावर खर्च होईल. खर्च वाढतील.

कुंभ - आत्मविश्वास वाढेल. संगीत ऐकायला आवडेल. आईकडून धनप्राप्ती होऊ शकते.

मीन - दाम्पत्य सुखात वाढ होईल. आई-वडिलांचे सानिध्य मिळेल. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम ऐकायला मिळतील. अधिक कष्ट करावे लागतील.

पं. राघवेंद्र शर्मा