पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | १७ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करीत असाल, तर चांगले योग आहेत. बढती मिळण्याची शक्यता. उत्पन्नात वाढ होईल.

वृषभ - मनात अशांतता राहिल. दिनक्रम बिघडेल. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकते. भेट म्हणून कपडे मिळण्याची शक्यता.

मिथुन - अकारण वादात पडणार नाही, याची काळजी घ्या. धर्म-कर्मात रुची वाढेल. रोजच्या दिनक्रमात अधिक कष्ट करावे लागू शकतात. उत्पन्न कमी होईल.

कर्क - शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. आईला एखादा आजार होऊ शकतो. स्वभावात चिडचिडेपणा येईल.

सिंह - कौटुंबिक जीवन सुखकारक राहिल. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

कन्या - आत्मविश्वास कमी होईल. वाणीमध्ये कठोर शब्दांचा वापर केला जाऊ शकेल. बोलताना सांभाळा. अधिक कष्ट घ्यावे लागतील.

तूळ - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. धार्मिक कामात व्यग्र राहाल. कार्यक्षेत्रातील स्थिती संतोषजनक राहिल.

वृश्चिक - नोकरीमध्ये स्थान परिवर्तन होण्याचे योग आहेत. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वडिलांना एखादा आजार होऊ शकतो.

धनू - जप-तप यामध्ये रुची वाढेल. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. 

मकर - कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. घरातील सजावटीवर खर्च होण्याची शक्यता.

कुंभ - मनात शांतता आणि प्रसन्नता राहिल. एखाद्या मित्राचे आगमन होऊ शकेल. रोजगार मिळण्याची संधी.

मीन - संततीला स्वास्थ्य विकार होऊ शकतात. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. शिक्षणात अडचणी येऊ शकतात.

पं. राघवेंद्र शर्मा