पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १६ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - मनात क्षणात आनंदी आणि क्षणात दुःखी भाव राहतील. शैक्षणिक आणि बौद्धिक कामात यश मिळेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत.

वृषभ - आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. एखाद्या मित्राच्या साह्याने उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील.

मिथुन - स्वभावात चिडचिडेपणा येईल. कुटुंबात सुख-शांती राहिल. तब्येत सांभाळा. खर्चात वाढ होऊ शकते.

कर्क - वाणीमध्ये सौम्यता राहिल. संततीच्या माध्यमातून सुखद बातमी येऊ शकते. मित्रांचे सहकार्य मिळेल. खाण्यापिण्यात रुची वाढेल.

सिंह - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. आत्मविश्वास वाढेल. मानसन्मान वाढेल. एखाद्या यात्रेवर जाण्याचे योग आहेत.

कन्या - उत्पन्न मिळण्यात अडचणी येऊ शकतात. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत.

तूळ - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव असतील. जोडीदाराला स्वास्थ विकार होऊ शकतात. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक - आत्मविश्वास वाढेल. कला आणि संगीताबद्दलची आवड वाढेल. कपड्यांवरील खर्च वाढेल. तब्येत सांभाळा

धनू - नोकरीमध्ये बदल होण्याचे योग आहेत. बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. खर्चही वाढेल.

मकर - जास्त राग येईल. कौटुंबिक समस्या वाढू शकतात. राहणीमानात बदल होईल. खर्च अधिक होईल.

कुंभ - मानसिक शांतता लाभेल. आत्मविश्वास वाढेल. धार्मिक संगीत ऐकायला आवडेल. उत्पन्न समाधानकारक राहिल.

मीन - कला आणि संगीत याबद्दलची आवड वाढेल. वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.

पं. राघवेंद्र शर्मा