पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १४ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - बोलताना संयम बाळगा. खर्च अधिक होत असल्याने चिंतीत राहाल. धर्म-कर्मामध्ये रुची वाढेल. आईचे सान्निध्य मिळेल.

वृषभ - आत्मसंयम बाळगा. राग अनावर होण्याची शक्यता. आईशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल.

मिथुन - आशा-निराशेचे समिश्र भाव मनात राहतील. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. मान-सन्मानात वाढ होईल.

कर्क - क्षणांत दुःखी क्षणांत आनंदी वाटेल. नोकरीमध्ये एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. अधिक परिश्रम करावे लागतील.

सिंह - मनात निराशा आणि असंतुष्टपणाचे भाव राहतील. स्वभावात चिडचिडेपणा येईल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत.

कन्या - धैर्यशीलपणा कमी होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. नोकरीमध्ये कार्यभारात वाढ होईल. उत्पन्न वाढेल.

तूळ - बोलताना कठोर शब्दांचा वापर होईल. बोलताना संयम बाळगा. धार्मिक कामात व्यग्र राहाल. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक - आत्मविश्वास वाढेल. धैर्यशीलपणा कमी होण्याची शक्यता. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत.

धनू - आळस अधिक असण्याची शक्यता. स्वभावात चिडचिडेपणा येईल. संततीला स्वास्थ्य विकार होऊ शकतात. खर्च वाढतील.

मकर - क्षणांत आनंदी क्षणांत दुःखी भाव मनात असतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्य होण्याची शक्यता. 

कुंभ - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. आई-वडिलांचे सानिध्य मिळेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत.

मीन - मानसिक शांतता राहिल. धैर्यशीलपणा कमी होण्याची शक्यता. संतती सुखात वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती राहिल

पं. राघवेंद्र शर्मा