पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १२ एप्रिल २०१९

राशिभविष्य

मेष - मन अशांत राहिल. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. खर्च वाढेल. संततीला त्रास होण्याची शक्यता 

वृषभ - संयम ठेवा. रागाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. उत्पन्न कमी होण्याची शक्यता. एखादे जुने येणे वसुल होईल.

मिथुन - मनात आशा-निराशेचे समिश्र भाव असतील. आईशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. जीवनसाथीचा सहयोग मिळेल.

कर्क - नोकरीमध्ये बदलीचे योग आहेत. एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. अधिक परिश्रम करावे लागू शकतात. 

सिंह - मानसिक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. क्षणात आनंदी आणि क्षणात दुःखी भाव राहतील. कौटुंबिक सुखात वाढ होईल. कुटुंबात मान-सन्मान वाढेल.

कन्या - मानसिक त्रास राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. एखाद्या राजनेत्याची भेट होऊ शकते. साठवलेली संपत्ती कमी होऊ शकते.

तूळ - कला आणि संगीत याची आवड वाढेल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती राहिल. जीवनसाथीला एखादा स्वास्थ्य विकार होऊ शकतो.

वृश्चिक - कुटुंबात एखादे धार्मिक कार्य होईल. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याकडून धन मिळण्याची शक्यता. तब्येतीची काळजी घ्या.

धनू - आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक आणि संशोधनाच्या कार्यात सकारात्मक परिणाम दिसतील. संततीला एखादा आजार होऊ शकतो. 

मकर - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. अधिक परिश्रम करावे लागतील.

कुंभ - मानसिक शांतता राहिल. बोलताना संयम बाळगा. संततीला स्वास्थ विकार होऊ शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल.

मीन - मन अशांत राहिल. कुटुंबाच्या समस्या वाढू शकतात. मनात नकारात्मक विचार राहतील. वडिलांचे सहकार्य मिळेल.

पं. राघवेंद्र शर्मा