पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १० मार्च २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मन अशांत राहिल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. जोडीदाराची साथ लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ - मानसिक शांती लाभेल मात्र आत्मविश्वास कमी जाणवेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. भेट मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत वैचारिक मतभेदाची शक्यता. 

मिथुन - मानसिक ताण जाणवेल. मुलाच्या तब्येतीची काळजी घ्या. शैक्षणिक क्षेत्रांत अडचणींचा सामना करावा लागेल. स्वभाव चिडचिडा राहिल. मित्रांचं सहकार्य लाभेल. 

कर्क - मानसिक तणाव जाणवेल.  मन अशांत राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळेल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

सिंह - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास भरपूर जाणवेल. नोकरीत सहकाऱ्यांसोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांचं आगमन होईल. शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम दिसतील. 

कन्या - मानसिक शांती लाभेल मात्र मनात नकारात्मक विचार येतील. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. भावंडांचं सहाकार्य प्राप्त होईल. खर्चात वाढ होईल. 

तूळ - आत्मविश्वास भरपूर जाणवेल मात्र स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. क्षणात दुखी, क्षणात आनंदी असे भाव राहतील. नोकरीच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळतील तसेच प्रगतीच्या संधीही उपलब्ध होतील.

वृश्चिक - क्षणात दुखी, क्षणात आनंदी असे भाव राहतील. कौटुंबिक समस्या वाढतील. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. कपड्यांवर खर्च वाढेल.  बोलताना संयम ठेवा.

धनू - बोलताना संयम ठेवा. खर्चात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सुखकारक असेल. आईला आरोग्याची समस्या जाणवेल. 

मकर - कौटुंबीक समस्यांमुळे मन अशांत होईल. जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. आत्मविश्वास जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

कुंभ - मन  अशांत राहिल. क्षणात दुःखी, क्षणात सुखी असे भाव राहतील. रागावर नियंत्रण ठेवा. पर्यटनाला जाण्याचा योग येईल.

मीन - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. नोकरीत परिवर्तनाचा योग आहे. 

पं. राघवेंद्र शर्मा