पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | १ एप्रिल २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - मानसिक शांती लाभेल. कला आणि संगीतात रुची वाढेल.  स्वभाव चिडचिडा राहिल. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ - मुलांच्या तब्येतीला जपा. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. स्वभाव चिडचिडा राहिल. शैक्षणिक क्षेत्रात कठीण प्रसंगाचा  सामना करावा लागेल.  

मिथुन -  मानसिक शांती लाभेल  मात्र कौटुंबिक समस्यांमुळे मन चिंतेत असेल.  बोलताना  संयम ठेवा. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल.  

कर्क - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मानसिक शांती लाभेल. कुटुंबांचं सहकार्य प्राप्त होईल.

सिंह - वडिलांचं मोलाचं मार्गदर्शन प्राप्त होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. मनात असंतोष खदखदत राहिल. कौटुंबीक समस्यांचा सामना करावा लागेल.

कन्या - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. संयमानं घ्या. मन अशांत राहिल. उत्पन्नात वाढ होईल. वादविवाद टाळा.

तूळ -  उत्पन्नात कमी आणि खर्चात मात्र वाढ होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वैचारिक मतभेद संभवतील.

वृश्चिक - कामाच्या ठिकाणी  उत्साह वाढेल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर पडेल. मित्रांचं सहकार्य प्राप्त होईल.  क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. 

धनू -  मानसिक शांती लाभेल मात्र बोलताना संयम बाळगा. कौटुंबीक समस्यांमुळे मन बेचैन होईल.  मित्रांच्या सहकार्यानं नोकरीच्या नव्या संधी प्राप्त होतील. 

मकर -  आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल मात्र रागाचा अतिरेक टाळा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील. खर्चात वाढ होईल. 

कुंभ - घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता.  मन शांत आणि प्रसन्न  राहिल. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उत्पन्नात वाढ होईल.

मीन - भावंडांची मोलाची साथ लाभेल. स्वत:वर संयम ठेवा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.  उत्पन्नात वाढ होईल.