Upay By Rashi In Marathi : जानेवारी महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत आज २७ जानेवारी सोमवारी केले जात आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला सोम प्रदोष व्रत केले जात आहे. आजच मासिक शिवरात्रीही साजरी केली जात आहे. तसेच आज सोमवार असल्यामुळे हा भगवान शंकराचा वार आहे. या खास योगाचा सर्व राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो.
संध्याकाळी सोम प्रदोषाची पूजा केली जाते. सोम प्रदोष व्रत करून प्रदोष काळात काही उपाय केल्यास व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे शिवप्रदोषाच्या दिवशी प्रदोष काळात राशीनुसार हे उपाय करा.
संध्या पूजा मुहूर्त - सायंकाळी ५ वाजुन ५६ मिनिटांपासुन ते रात्री ८ वाजुन ३४ मिनिटांपर्यंत
कालावधी - ०२ तास ३८ मिनिटे
मेष - या राशीच्या लोकांनी महादेवाचा गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करावा.
वृषभ - या राशीचे लोकांनी भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करावे.
मिथुन - महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा.
कर्क - भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कणेरचे फुले अर्पण करा.
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भांग अर्पण करा.
कन्या - भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर धोत्रा अर्पण करा.
तूळ - तूळ राशीच्या लोकांनी शिवाला पंचामृताने अभिषेक करा.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान शंकराची विधिवत पूजा करावी आणि शिव चालीसा वाचावी.
धनु - शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ॐ नम: शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
मकर - भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी आणि शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शिव चालीसा वाचा.
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे आणि भगवान शंकराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा.
मीन - शनीचा अनिष्ट प्रभाव कमी करण्यासाठी शिवलिंगाला कच्च्या दुधाने अभिषेक करावा.
संबंधित बातम्या