Surya Grahan : आज सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर होईल शुभ-अशुभ परिणाम, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Surya Grahan : आज सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर होईल शुभ-अशुभ परिणाम, जाणून घ्या

Surya Grahan : आज सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर होईल शुभ-अशुभ परिणाम, जाणून घ्या

Published Oct 02, 2024 06:17 PM IST

Surya Grahan Positive and Negative Effect on Zodiac Signs : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण आज रात्री होणार आहे. हे ग्रहण देशात दिसणार नाही, परंतु सर्व १२ राशींवर त्याचा परिणाम होईल. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी हे ग्रहण शुभ आणि अशुभ आहे.

सूर्यग्रहण २०२४ राशींवर शुभ-अशुभ परिणाम
सूर्यग्रहण २०२४ राशींवर शुभ-अशुभ परिणाम

Surya Grahan Positive and Negative Impact on Zodiac Signs : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण बुधवार, २ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून देशात कोणतेही वेधादी नियम पाळले जाणार नाही, परंतु या दिवशी ग्रहांच्या संयोगाचा मेष ते मीन राशींवर व्यापक प्रभाव पडेल. सूर्यग्रहणाचा प्रभाव काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ राहील. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी सूर्यग्रहण शुभ आणि अशुभ आहे.

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरुपात म्हणजेच रिंग ऑफ फायर असेल. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री ९ वाजून १३ मिनिटे ते पहाटे ३ वाजून १७ मिनिटापर्यंत राहील. म्हणजेच हे ग्रहण २ आणि ३ ऑक्टोबरच्या रात्री होणार आहे. सूर्यग्रहणाचा कालावधी ६ वाजून ०४ मिनिटापर्यंत राहील. अशा स्थितीत, सूर्यग्रहणाच्या वेळेनुसार भारतात रात्र असेल, त्यामुळे येथे सूर्य दिसणार नाही, त्यामुळे सूर्यग्रहण भारतात वैध नाही.

ग्रहणाचा राशीच्या लोकांवर शुभ-अशुभ परिणाम

ग्रहणाचा सकारात्मक प्रभाव मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक राशीवर राहील आणि ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव मिथुन, सिंह, कन्या, तूळ, धनु, कुंभ आणि मीन राशीवर अधिक राहील.

कोणत्या देशांमध्ये दिसणार सूर्यग्रहण - 

दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेचा काही भाग, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, न्यूझीलंड, पेरू, फिजी आणि अर्जेंटिना इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे.

सुतक कालावधीचे नियम भारतात लागू होणार नाहीत - 

सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी लागू होतो. हे सूर्यग्रहण रात्री होत आहे, त्यामुळे ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे देशात सुतक काळातील नियम लागू होणार नाहीत.

वर्ष २०२५ मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होईल?

पुढील वर्षी २०२५ मध्ये होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल बोलायचे झाले तर जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ पर्यंत २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण होतील, म्हणजेच एकूण ४ ग्रहण होतील. पहिले चंद्रग्रहण १४ मार्च रोजी होईल तर दुसरे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी होईल. तसेच, पहिले सूर्यग्रहण २९ मार्च रोजी तर दुसरे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी होईल.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner