नवीन वर्ष २०२४ मध्ये कन्या राशीत २ ग्रहण तर मीन राशीत २ ग्रहण लागणार आहे. चंद्र आणि सूर्यग्रहण ही दोन्ही खगोलीय घटना आहेत जी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या स्थितीमुळे उद्भवतात. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्रग्रहणांना विशेष महत्त्व आहे. या काळात शुभ कार्य आणि पूजा करण्यास मनाई आहे.
नवीन वर्ष २०२४ मध्ये २५ मार्च रोजी कन्या राशीत उपछाया चंद्रग्रहण लागेल, यानंतर ८ एप्रिल रोजी मीन राशीत सूर्य ग्रहण राहील. १८ सप्टेंबरला मीन राशीत आंशीक चंद्रग्रहण लागेल आणि शेवटचे २ ऑक्टोबर कन्या राशीत वलायाकार सूर्य ग्रहण लागेल.
कन्या राशीत वर्ष २०२४ मध्ये दोन ग्रहण लागत आहे. तर मीन राशीत वर्ष २०२४ मध्ये दोन ग्रहण लागत आहे. या प्रकारे वर्ष २०२४ मधले चारही ग्रहण कन्या आणि मीन राशीत लागणार आहे. अशात ग्रहणाचा प्रभाव कन्या आणि मीन राशींवर होईल. ग्रहणानंतर ३ महीने कन्या आणि मीन राशीच्या लोकांनी सतर्क राहावे.
या ग्रहणाचा कुंभ, कन्या आणि सिंह राशींना लाभही होईल. या राशींचे अडकलेले काम पूर्ण होईल आणि आर्थिक लाभही वाढेल. वर्ष २०२४ मध्ये पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी आणि शेवटचे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर रोजी लागेल. वर्ष २०२४ मध्ये पहिले चंद्रग्रहण २५ मार्च रोजी राहील तर शेवटचे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी होईल.
पहिले सूर्यग्रहण फक्त उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतच दिसणार आहे. दुसरे सूर्यग्रहण दक्षिण आफ्रिका, चिली आणि अर्जेंटिनामध्ये स्पष्ट दिसेल. पहिले चंद्रग्रहण युरोप, ईशान्य आशिया, ऑस्ट्रेलियाचा मोठा भाग, आफ्रिकेचा काही भाग, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दृश्यमान असेल. याशिवाय पॅसिफिक महासागर, अटलांटिक, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्येही ते दिसणार आहे.तर दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्ये देखील दृश्यमान असेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या