Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : तूळ राशीच्या लोकांना अपेक्षित यश लाभेल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : तूळ राशीच्या लोकांना अपेक्षित यश लाभेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : तूळ राशीच्या लोकांना अपेक्षित यश लाभेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mar 09, 2024 01:17 PM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 9 march 2024 : आज ९ मार्च २०२४ शनिवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह,कन्या, तूळ, व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह,कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह,कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. विष्टी, चतुष्पाद करण आणि सिद्ध योग आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंहः 

आजचं चंद्रबल पाहता विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणा साठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशा संदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदय कारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्याः 

आज ग्रहयुतीत व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. फक्त अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल. एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील. चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. आणि याची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज आपल्या राशीत होणारा शुभयोगामुळे जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाया तील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०१, ०८.

वृश्चिक: 

आज अशुभ स्थानातील चंद्रभ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहिल. आर्थिक स्थिती सुधारण्या साठी थोडा काळ थांबावे लागेल. घरातील खर्च अपरिहार्य कारणा मुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. नोकरी निमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोष जनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.

शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

Whats_app_banner