Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होतील वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होतील वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होतील वाचा चारही राशींचे भविष्य

Published Apr 06, 2024 10:58 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 6 April 2024 : आज ६ एप्रिल २०२४ शनिवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : आज चंद्र शनिच्या राशीतुन आणि राहुच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंहः 

आज शुभ स्थानातील ग्रहयोग पाहता व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आनंदी उत्साही रहाल. नवीन स्थावर घेण्यासाठी प्रयत्नात रहाल. नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी रहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०५.

कन्या: 

आज ग्रहयोग अनुकुल असल्याने लोकांच्या मनात तुमच्याबद्दल सुप्त दरारा निर्माण कराल. घरातील शांतता ढवळून निघेल. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणच्या आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसां पासून अडलेली ऑर्डर हातात पडेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. संवाद वाढेल. आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामजस्य राहील. व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे.

शुभरंग: पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज शुक्ल योगात खूप दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेश प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा राहील. तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.

वृश्चिकः 

आज चंद्राची स्थिती लक्षात घेता स्वत:ची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम रहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.

Whats_app_banner