Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : आज चंद्र धनु राशीत संक्रमण करत असून, गुरू-हर्षलशी संयोग करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज अनिष्ट ग्रहमान असल्याने दिवस प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारा आहे. आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी.
शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.
आज चंद्रगोचर गुरूशी शुभ संयोग करत आहे. कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. परंतु यशाचं माप लगेच पदरात पडेल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहिल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.
आज चंद्रभ्रमण अनुकूल असल्याने तुमच्यात असलेली कला लोकांपर्यंत पोचावी याचा आटोकाट प्रयत्न कराल. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खूष होऊन जाईल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०४, ०९.
आजचं चंद्रबल पाहता विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशा संदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदय कारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.