Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : आज चंद्र वृश्चिक राशीत संक्रमण करत असून, गुरू आणि नेपच्युनशी योग करणार आहेत. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज बुधाच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. रोजगारात अत्यंत महत्वपूर्ण कामात सावधानतेने पाऊल उचला. कामात उत्साह वाढणार आहे. जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणीं कडून सहकार्य लाभणार आहे. एकंदरित कामकाजा साठी दिवस चांगला राहणार आहे.
शुभरंग: लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०८.
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. पायाची दुखणी होऊ शकतात. संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास होऊ शकतो. संसारात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागले तरी त्यात थोडी तडजोडही करावी लागेल. प्रवास आवश्यक असल तरच करा. नोकरीत कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. नोकरीत स्वतःचा निर्णयावर ठाम राहिल्याने आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतील. आपले प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. सन्मान व किर्ती डागळण्याची शक्यता आहे. खर्च विचारपूर्वक करावा. सरकारी कामे रखडतील. व्यापारात आर्थिक हानी घडण्याची शक्यता आहे. मनस्ताप हानी होण्याची शक्यता चालूनही आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.
आज वज्र योगात रोजगारात घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष रहातील. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगल्यापैकी मूड लागेल. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. आत्म विश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. कुंटुंबातील समस्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर नियोजन सोडविण्याचा प्रयत्न करा. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहिल. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल. प्रवासातुन आर्थिक लाभ होईल.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने तुम्ही श्रद्धाळू असलात तरी तुमच्या विचारांमध्ये कायम एक गोंधळ राहील. तरुणांना प्रेमात पडावेसे वाटेल पण ते व्यक्त करण्याचे धाडस गोळा करावे लागेल. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. अवास्तव गोष्टींकडे जास्त आकर्षित व्हाल. खूप सद्भावनेने एखादी गोष्ट करायला जावी आणि पदरी फक्त वाईटपणा यावा असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यापारात नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगुन काम करा. अन्यथा हानी संभवते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होतील. नवीन खरेदीत पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे. सामाजिक किंवा साहित्यिक समारंभात भाग घ्याल. भांडण आणी वाढविवाद टाळावेत. पत्नीसोबत वाद घालू नका.
शुभरंग: नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.