मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : तूळ राशीच्या लोकांना मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल! वाचा राशीभविष्य

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : तूळ राशीच्या लोकांना मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल! वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 29, 2024 01:57 PM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 29 march 2024 : आज २९ मार्च २०२४ शुक्रवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ, व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : चंद्र तूळ राशीतुन भ्रमण करीत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंह: 

आज वज्र योगात विचार पूर्वक निर्णय घ्या. उत्तम कल्पनाशक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे. दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर रहाल. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची दाद चांगली मिळेल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलो पार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष दयावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्या: 

आज चंद्र मंगळ संयोगात दिनमान विशेष कृपा कारक आहे. प्रेमीजनांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. अस्थिर आणि चंचल स्वभावामुळे घरातील लोकांशी मात्र खटके उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल. परंतु तेथील वातावरण मात्र उल्हासित करणारे असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज चंद्रगोचर शुक्र ग्रहाशी शुभ संयोग करत आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील. स्फूर्तिदायक घटना घडल्यामुळे कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक: 

आज चंद्रबलं उत्तम लाभल्याने मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. नोकरी व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. ग्रहांची साथ चांगली मिळेल. स्वतःचा मान राखून जेवढी कामे उरकता येतील तेवढी उरकणार आहात. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहणार आहे.

शुभरंग: नारंगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.