sinh kanya tula vrishchik horoscope today : सिंह, कन्या, तुला, वृश्चिक राशीच्या लोकांचा दिवस कसा जाईल? वाचा!-sinh kanya tula vrishchik rashi prediction today 27 march 2024 leo virgo libra scorpio zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  sinh kanya tula vrishchik horoscope today : सिंह, कन्या, तुला, वृश्चिक राशीच्या लोकांचा दिवस कसा जाईल? वाचा!

sinh kanya tula vrishchik horoscope today : सिंह, कन्या, तुला, वृश्चिक राशीच्या लोकांचा दिवस कसा जाईल? वाचा!

HT Marathi Desk HT Marathi
Mar 27, 2024 12:35 PM IST

sinh kanya tula vrishchik rashi prediction today 27 march 2024 : सिंह, कन्या तुला, वृश्चिक राशीचा दिवस आज कसा जाईल? वाचा सविस्तर…

सिंह कन्या तुला वृश्चिक राशीचं आजचं भविष्य काय?
सिंह कन्या तुला वृश्चिक राशीचं आजचं भविष्य काय?

सिंह

आज चंद्रबळाचा लाभ आहे. प्रयत्नांना यश मिळेल. मानसन्मान मिळेल. विरोधकही तुमचे प्रशंसक बनतील. कामाचा दर्जा सुधारेल. समतोल विचार करण्याच्या स्वभावाचा फायदा होईल. अनेक जणांचे सल्लागार बनाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मानसिक आरोग्य उत्तम राहील. अतिउत्साह व अतिरेक टाळा. नोकरीच्या ठिकाणी अडकलेली कामं पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. औद्योगिक क्षेत्रातील लोकांसाठी भरभरटीचा दिवस आहे. शुभरंग: लालसर शुभदिशा: पूर्व. शुभअंकः ०५, ०८.

कन्या

चंद्राचं शुक्राच्या राशीतून होणारं भ्रमण आज व्यक्तिमत्त्वातील सुधारणेच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. जोडीदाराला पुरेसा वेळ द्याल. मनोरंजनासाठी वेळ मिळेल, त्यात मन रमेल. भाग्याची साथ मिळेल. नवीन कल्पनांवर काम करण्याचा विचार करा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. भरभराटीचा योग आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. दुसर्‍याला जामीन राहू नका अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर. शुभअंकः ०३, ०७.

तुला

आज अनिष्ट ग्रहमान आहे. दिवस प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारा आहे. आर्थिक घडी विस्कटेल. प्रवास करताना विशेष काळजी घ्या. प्रेमळ आणि संयमी स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. घरात थोडी कुरकूर राहील. कुटुंबाकडं दुर्लक्ष झाल्यामुळं घरातील सदस्य चिडचिड करतील. मानसिक क्लेश उत्पन्न होईल. झोपेचा त्रास जाणवेल. मनावर संयम ठेवा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. मन चिंताग्रस्त राहील. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारात फसगत होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. शुभरंग: भगवा शुभदिशा: आग्नेय. शुभअंकः ०१, ०८.

वृश्चिक

चंद्रगोचर शुक्राशी शुभ संयोग करत आहे. नव्या कल्पना सुचतील. कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल, मात्र यशासाठी वाट पाहावी लागेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. प्रेमप्रकरण यशस्वी होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडं दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी. रखडलेली कामं पूर्ण होतील जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. पदप्रतिष्ठेचा योग आहे. साहित्य क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. दूरचा प्रवास घडेल. शुभरंग: नारंगी शुभदिशा: दक्षिण. शुभअंकः ०४, ०९.

Whats_app_banner