Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भरभराटीचा दिवस! वाचा चारही राशींचे राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भरभराटीचा दिवस! वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भरभराटीचा दिवस! वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

Feb 25, 2024 09:36 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 25 february 2024 : आज २५ फेब्रुवारी २०२४ रविवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ, व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

Leo, Virgo, Libra, Scorpio
Leo, Virgo, Libra, Scorpio

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : आज चंद्र सिंह राशीतून भ्रमण करीत असून, गुरू-हर्षलशी नवमपंचम शुभ योग निर्माण होत आहे. सुकर्मा योग देखील आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंहः 

आज चंद्राशी होणारा शुभ ग्रहांचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. पार्टनरशिपच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. निरनिराळ्या सूचना कल्पना व्यावसायिकदृष्ट्या आमलात आणा.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.

कन्याः 

आज प्रतिकूल ग्रहयुतीमुळे दुर्मिळ गोष्टींचा संग्रह कराल. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याची दक्षता घ्या. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः हिरवा, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज चंद्रगोचरात जुनी येणी वसूल होतील. कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०१, ०९.

वृश्चिकः 

आज सुकर्मा योगातील चंद्र भ्रमणात समजूत दार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयाप्रत पोचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेलं असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहील.

शुभरंगं: तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.

Whats_app_banner