मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi : सिंह ते वृश्चिक… या राशींच्या आयुष्यात आज नवं काय घडणार? जाणून घ्या

Sinh Kanya tula vrishchik Rashi : सिंह ते वृश्चिक… या राशींच्या आयुष्यात आज नवं काय घडणार? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 24, 2024 08:49 AM IST

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction 24 march : चंद्रभ्रमणात आज या राशींना मिळणार लाभ, असं आहे रविवारचं राशी भविष्य! पाहा

Sinh Kanya tula vrishchik Rashi horoscope today 24 march
Sinh Kanya tula vrishchik Rashi horoscope today 24 march

Sinh Kanya tula vrishchik Rashi horoscope today 24 march : आज रविवारी (२४ मार्च) हुताशनी पौर्णिमेचा चंद्र सुर्याच्या नक्षत्रातुन आणि रवि, बुधाच्या राशीतुन भ्रमण करणार आहे. चंद्र केतुशी देखील संयोग करीत असुन ग्रहणयोग घटीत होत आहे. आज गंड योगात राशीचक्रातील सिंह, कन्या, तुळ व वृश्चिक यांच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? ते जाणून घेऊया

सिंहः आज अनिष्ट ग्रहमान असल्याने वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. खर्चाचा आकडा थोड़ा वाढल्यामुळे तसे वाटणे साहजिक असले तरी पैसे मिळणार आहेत. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापट पणा वाढेल. अविचार महागात पडेल. आपल्याला मनस्ताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. 

शुभरंगः लालसर शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०१, ०९.

कन्याः आज रविच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात काही महत्त्वाची कामे रखडतील. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. अती संवेदनशील स्वभावामुळे कधीकधी यांचे नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायदयाच्या चौकटीत राहुन कामे करावीत. नियम बाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्‌भवतील. कुटुंबापासुन विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल. 

शुभरंगं: हिरवा शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०७, ०९.

तूळ: आज अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल.व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जन मानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. 

शुभरंगः गुलाबी शुभदिशाः पश्चिम.शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः आज चंद्राशी होणारा शुभ ग्रहांचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. पार्टनरशिपच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल.

शुभरंगः केशरी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०५, ०८.

WhatsApp channel

विभाग