मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 23, 2024 11:18 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 23 march 2024 : आज २३ मार्च २०२४ शनिवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ, व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : चंद्राचा गुरू आणि हर्शल सोबत संयोग होत असून गजकेसरीयोग घटित होत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंहः 

आज गुरू-चंद्र योगात घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी रहिल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्याः 

आज गुरूशी होणारा योग पाहता आपणास शुभअशुभ अशी समिश्र स्वरुपाची फळे मिळतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग बनतील. तुमची स्थिती उत्तम होईल. प्रयत्न करून आणि आपल्या धैर्याच्या प्रति सजग राहण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. अनिष्ट चंद्रभ्रमणात मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०१, ०४.

तूळ: 

आज हर्शल-चंद्र योग आपणास आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. थोराचे निर्णय लाभदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे.प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.

शुभरंग: भगवा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

वृश्चिकः 

आज चंद्रबल उत्तम असल्याने अंत्यत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांनी कौटुंबिक जीवनात आणि समृद्धी आणेल. मेहनत आणि कुठल्या ही कार्याच्या प्रति तुमचा कल पाहून आपल्या उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.