मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वाहन खरेदीचे योग! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वाहन खरेदीचे योग! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 22, 2024 10:29 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 22 march 2024 : आज २२ मार्च २०२४ शुक्रवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ, व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : चंद्र मंगळ,शुक्र आणि शनिशी प्रतीयोग करीत असून सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंह: 

आज चंद्र आर्थिक बाबतीत अनुकुल असल्याने आपणास आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. समाजात प्रतिष्ठा मिळेल पण त्यासाठी भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. परदेशग मनाच्या संधी येतील. तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जाचकच होणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. योग्य नियोजन आचुक निर्णय यामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल.

शुभरंग: लालसर, शुभदिशा पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्याः 

आज चंद्रबल अनिष्ट आहे. अचानक धन लाभाच्या कोणत्याही मार्गाला न जाणेच इष्ट ठरेल. शेअर गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. नेहमी पेक्षा घरच्या समस्यांकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. थोडक्या कारणावरून रागाचा पारा चढल्यामुळे घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. भावंडां बरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. नातेवाईक मित्र मंडळीबाबत दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गांनी व्यवहार जपुन करावेत.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज लाभदायक योगात काही शुभ घटनाही घडतील. तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. काहीबाबतीत गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. व्यवसायात कामगारांच्या सहकार्याने कामाचा गाडा बराच ओढून न्याल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. ललित कला व शिल्पशास्त्रांकरीता तसेच कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. आपल्या तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०१, ०५.

वृश्चिक: 

आज चंद्र शुभस्थानात असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. मुलांसाठी वाट्टेल ते करणारी तुमची मनोवृत्ती असली तरी त्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. आज नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिनमान राहील.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०६.