Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Updated Mar 21, 2024 10:32 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 21 march 2024 : आज २१ मार्च २०२४ गुरुवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ, व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : चंद्र स्वराशीतुन आणी बुधाच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंहः 

आज चंद्र शनि दृष्टीयोग योग पाहता करियरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रातवाव मिळेल पण त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. दिनमान कामाच्या दृष्टीकोनातून कष्टदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०९.

कन्याः 

आज चंद्र प्लुटो युतीत व्यवसायात कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. इतरांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले तरी बाकी कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रयत्नाला महत्त्व द्यावे लागेल. मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्यांमुळे वैतागुन जाल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज चंद्राचं बल लाभल्याने आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०६, ०९.

वृश्चिकः 

आज चंद्राशी होणारा योग पाहता थोडेसे धूर्त संयमितपणा बरोबरच धोरणी रहाल. काही करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील. तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा बेपर्वाईपणा राहील. प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल. आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल.

शुभरंग: नारंगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

Whats_app_banner