Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांना आर्थिक सहकार्य लाभेल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांना आर्थिक सहकार्य लाभेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांना आर्थिक सहकार्य लाभेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mar 20, 2024 02:03 PM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 20 march 2024 : आज २० मार्च २०२४ बुधवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ, व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : चंद्र पुष्य या सर्वाधिक शुभ नक्षत्रातुन गोचर करीत असून स्वराशीतून संक्रमण करीत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंह: 

आज ग्रहयोग चांगले आहेत. तुमच्या कामाचा वेग आणि धाडस वाखाणण्यासारखे असेल. व्यवहारात कोणत्या वेळी कसे निर्णय घ्यावे याची जाण येईल. धंद्यात चांगली प्रगती कराल. लहानात लहान होऊन आणि मोठ्यात मोठे होऊन रमून जाल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. आरोग्याच्या थोडयाफार समस्या उद्‌भवतील. परिवारातून शुभ संदेश मिळतील. कुटुंबासोबत दुरवरच्या प्रवासाचं नियोजन कराल.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०९.

कन्या: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने उत्तम नियोजना मुळे नोकरीत कौतुकास पात्र ठराल. व्यवसायात कष्ट जास्त पण त्यामानाने पैसा मात्र लगेच दृष्टी पडणार नाही. कलाकाराना आपली कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. फायदा तोटा बाजूला ठेवला तरी धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक आणि योग्य समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वाढविवाद मात्र टाळावे. आर्थिक बाबतीत लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज चंद्र गोचर शुभ स्थानातून होत आहे. नवीन चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी बदलाचे योग आहेत. व्यवसायात दुसरा एखादा व्यवसाय चालू करण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. नोकरी ठिकाणी वातावरण उत्साही आनंदी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे कामाला आपोआपच गती येईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल. दुरवरचे प्रवास लाभदायक भौतिक सुख उत्तम मिळेल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज चंद्र नेपच्युन संयोगात प्रत्येक काम फत्ते करणार आहात. संयमाची कसोटी तुम्हाला सांभाळावी लागेल. प्रेमळ आणिपरोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्या मुळे कामे उलटपालट होऊन जातील. रागाचा पारा एकदम चढल्यामुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०५, ०९.

Whats_app_banner