मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांनी मन शांत ठेवावे! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांनी मन शांत ठेवावे! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 02, 2024 09:52 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 2 April 2024 : आज २ एप्रिल २०२४ मंगळवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : आज बुध मार्गी अवश्थेतुन वक्री अवस्थेत जाणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंहः 

आजचं चंद्रभ्रमण आपणास भाग्यकारक अनुभव देणारा आहे. तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. चित्रकार शिल्पकारांना अनेक संधी दार ठोठावतील. परदेशग मनाचे योग संभवतात. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत मोजकेच काम करा पण ते बिनचूक असल्याची खात्री करा. पैशाबाबत काटेकोर रहाल आणि इतरांनीही तसे राहावे अशी तुमची इच्छा असेल. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचबरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०१, ०५.

कन्याः 

आज अनिष्ट चंद्रभ्रमणात एखादा निर्णय घेताना स्वतःच संभ्रमात पडाल. नको त्या गोष्टींवर खल करत बसाल आणि हातात मात्र काहीच पडणार नाही. करिअरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. यंत्रावर काम करणारांनी अवश्य काळजी घ्यावी. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल.आपणास काहीस त्रासदायक ठरणार आहे. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. यामुळे ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल. आळसीवृत्ती टाळावी. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्ती मध्ये नविन समस्या उद्‌भवतील. अचानक संकट येण्याची संभावना आहे. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. तुम्हाला वादामधुन नुकसान सहन करावे लागेल.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज चंद्रबल अनुकूल असल्याने नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीमुळे आर्थिक लाभ चांगले होतील. अडथळ्याच्या शर्यतीतून का होईना पण पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. घरातील हलक्या फुलक्या वातावरणामुळे सुखावून जाल. करिअरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल. नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहील. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कर्जप्रकरण मंजुर होतील. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपुन घ्यावा. नवीन योजनेत वाढ विस्तार करण्यासाठी अनुकुल दिवस आहे.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात भावनांची थोडीशी ओढाताण झाल्यामुळे मनाला ताण जाणवेल. संतती कडून अपेक्षाभंग होऊ शकतो. मुलांच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ ठेवावा लागेल. स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट राखून घ्यावे लागतील. व्यसनांपासून सावध रहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. छोट्याशा कारणाने मनशांती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवती पेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवा. आळश झटकुन कामाला लागा. शारिरिक आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढेल.

शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.

WhatsApp channel