Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : गुरू आणि हर्षलचा चंद्रासोबत योग घटीत होत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज नोकरीत थोडा दूरदर्शीपणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृती कडे दूर्लक्ष करून चालणार नाही. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल यात शंका वाटते. नवनविन प्रलोभने येत राहतील. आपली मानसिकेला विचलित करणाऱ्या घटना घडतीत. व्यापारात काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. चंद्रावर शनीची दृष्टी असल्याने मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०७.
आज चंद्र बलवान असल्याने बौद्धीक गोष्टींकडे ओढा राहील. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. तुम्ही करीत असलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडण्याची कुवत आज दाखवून द्याल. आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा. निर्माण होईल. कुटुंबापासुन वेगळे राहण्याचे प्रसंग येतील
शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०१, ०५.
आजचं चंद्र भ्रमण शुभ असल्याने नोकरी व्यवसायात आपल्या कामाच्या पद्धतीत बदल कराल. गोड बोलण्यावर भर ठेवाल. तुम्ही स्वत: ज्या गोष्टींचे चिंतन कराल त्यातून भरीव काहीतरी निर्माण करून फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. आनंददायी वातावरण राहिल. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत.
शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०८.
आजचं चंद्रबल विचारात घेतानोकरीत योग्य संधी न मिळाल्यामुळे संभ्रमात पडाल. येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तर्कशुद्ध विचारांचा मागोवा घ्यावा लागेल. घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल. कामाला जास्त महत्त्व द्याल. खूप नकारात्मक विचार मनात येतील. त्यांना सकारात्मक बनवलेत तर कामे पुढे जातील. मनावरचा ताण बर्या पैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०३, ०९.