Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : कन्या राशीच्या लोकांना यशाचा व लाभाचा गुरुवार! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : कन्या राशीच्या लोकांना यशाचा व लाभाचा गुरुवार! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : कन्या राशीच्या लोकांना यशाचा व लाभाचा गुरुवार! वाचा चारही राशींचे भविष्य!

Updated Mar 14, 2024 01:04 PM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 14 march 2024 : आज १४ मार्च २०२४ गुरुवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ, व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : पंचमीचा चंद्र दिवस रात्र मंगळाच्या आणि शुक्राच्या राशीतुन भ्रमण करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य! भविष्य!

सिंह: 

आजच्या चंद्रभ्रमणात बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. प्रेमीजनांना प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात. व्यापारात उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. हानी होऊ शकते. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. स्वभावात थोडा बेपर्वाईपणा राहील. अविचारीपणा योग्य नाही विचारा अंतीच निर्णय घ्यावेत. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. सरकारी नोकरीत असाल वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. 

शुभरंग: लालसर शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०१, ०५.

कन्याः 

आज चंद्र लाभदायक असल्याने हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्नाला सफलतापूर्वक यश मिळेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती संतोषजनक राहिल. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. शुभ कार्यात सहभागी व्हाल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज वैधृती योगात भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजना आणि नियोजनानुसार काम करा. काही करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील. त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भावंडाकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. ध्येयापासून विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेल्या योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक: 

आज चंद्रबल शुभ स्थानातुन असल्याने नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. आपल्या कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रिय जनांच्या भेठीगाठी होतील.

शुभरंग: नारंगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०२, ०४

Whats_app_banner