Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : आज बुध या ग्रहाचा चंद्राशी संयोग होत असुन दिनमानावर बुधाचा विशेष प्रभाव राहील. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज बुधाच्या मालकीच्या नक्षत्रातुन चंद्रभ्रमण पाहता तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. घरगुती उपयोगी वस्तु खरेदी कराल. सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण होतील. नवीन योजनेचा शुभारंभ होण्याचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. अनेक नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. नोकरदार पत्नीकडून सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होऊन नफ्यात वाढ होईल. दूरवरचे प्रवास आनंददायक होतील. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.
शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०५.
आज चंद्र बुधाच्या नक्षत्रातुन गोचर करतोय. पंरतु अशुभ स्थानातून होत असलेल्या चंद्र भ्रमणात अपेक्षीत सफलता लाभणार नाही. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. जोडीदारा बरोबर मतभेद झाले तरी कोणतीही टोकाची भूमिका न घेतलेलीच बरी राहील. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. दिवस धगधगीचा आणि धावपळीचा राहील. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्या. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण कराल. निरर्थक कामात वेळ वाया घालवू नका. स्थावर मालमत्तेत काही अडचण येण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरी कायदयाचे वाद असतील तर सामोपचाराने मिटवा. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०६.
आज अनुकूल ब्रह्मा योगात भाग्याची साथ लाभणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.अत्यंत अनुकुल दिवस आहे. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. कोणाचाही द्वेष तिरस्कार करू नका. नवीन योजना फायदेशीर ठरतील. व्यापारात काही नवीन भागीदारा सोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्य जोडीदारा कडून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगति होईल. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. आपला लौकिक सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कलाकारांना योग्य संधी मिळतील.
शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्रगोचरात प्रतिकूल दिनमान राहील. आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. विपरित परिणाम दिसतील. बँकेत कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. काहीसा अडचणीत आणणारे दिनमान राहील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उदभवेल. मोठे धाडसी निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणीं बरोबर व्यवहार करताना जपून करा. जीवनसाथीसोबत वैचारिक पातळीवर मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारिक प्रकरणात जबाबदारी वाढणार आहे. आप आपसातील वाद समझदारीने मिटवा. भागीदारा सोबत वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा.
शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०७.
संबंधित बातम्या