मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांचा खर्च अधिक वाढेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : वृश्चिक राशीच्या लोकांचा खर्च अधिक वाढेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 11, 2024 09:40 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 11 march 2024 : आज ११ मार्च २०२४ सोमवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ, व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : आज चंद्र गुरूच्या राशीतुन आणि शनिच्या नक्षत्रातुन संक्रमण करणार असून, सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंह: 

आज राहु-चंद्र युतीत नोकरीत जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात आर्थिक स्थिती चांगला राहणार आहे.नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.व्यापारात लाभ होईल. लेखन कला कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. आर्थिक समस्या दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आकस्मिक आर्थिक लाभ होतील.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०७.

कन्याः 

आज चंद्रबल पाहता व्यवसायात आपले निर्णय अचूक ठरतील. भांवडाकडून सहकार्य लाभेल. भाग्य अनुकुल वातावरण निर्माण करेल. चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल. प्रवासातुन लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे. शुभ कार्यात सामील व्हाल. मान सन्मान मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. नोकरीत स्थान बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन होईल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. व्यवसायिक मंडळीना नवीन व्यापार प्रस्ताव येतील.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०२, ०७.

तूळ: 

आज शुभ चंद्रभ्रमणा मुळे आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. नोकरीत कामात यश मिळेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. देवधर्म आध्यात्मिक कार्य घडेल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. शासकीय कामात शुभ दिवस आहे. अध्यात्माची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन क्षेत्रात संधी मिळेल. कर्तुत्व सिद्ध कराल. ज्येष्ठ व्यक्तिंच्या सहवास लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहिल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०७, ०८.

वृश्चिकः 

आज राहु-चंद्र प्रतियोगात आपणास प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागू शकतो. आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. रोजगारात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुःखद घटना ऐकायला मिळतील. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनिष्ट दिवस असणार आहे. घातपातच भय रहिल. आजार उदभवून शस्त्रक्रियासारखी घटना संभवते. दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे. दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. रागावर नियंत्रण ठेवा. वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक हानी अथवा खर्चात वाढ होईल. उत्पन्नापेक्षा खर्च आधिक होईल.

शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०७.

WhatsApp channel