मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : मान-सन्मानाचा व आनंदाचा रविवार! वाचा चारही राशींचे भविष्य!

Sinh Kanya tula vrishchik Rashi Prediction : मान-सन्मानाचा व आनंदाचा रविवार! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 10, 2024 10:48 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction today 10 march 2024 : आज १० मार्च २०२४ रविवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह,कन्या, तूळ, व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. साध्य योग आणि किस्तुघ्न करण असा दुहेरी शुभ योग आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंह: 

आज साध्य योगात प्रयत्न सफलदायक ठरतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घेण्यात आघाडीवर राहिल्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. कोणावर विसंबून राहिलात तर मात्र तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०१, ०९.

कन्या: 

आज चंद्र शुक्राच्या संयोगात नवीन वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तसेच सहकार्यही तुम्हाला मिळेल. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. दिवस आनंदात व्यतीत कराल.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०५.

तूळ: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. हप्ते फेडताना त्रास होईल. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. कुटुंबा तील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.

शुभरंग: नारंगी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक: 

आज चंद्रबल उत्तम राहील. अनुकुल स्थिती राहणार आहे. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. उत्तम कल्पनाशक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची दाद चांगली मिळेल. आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडुन समाधान मिळेल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०७.

WhatsApp channel