Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya today : आज चंद्र शुक्राच्या तूळ राशीत भ्रमण करणार आहे. ध्रुव आणि व्याघात योग असा दुहेरी शुभ योगही आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज आपल्याला रविचं बलं लाभल्याने आत्मविश्वास वाढल्यामुळे ध्येयावर प्रेम कराल. सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे जाल. समोर आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहील. नोकरी व्यवसायात समाधानकारक सुधारणा जाणवेल. पुर्वीचे प्रकल्प व कामे आज आपणास मदतीला येणार आहेत. धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. आपल्या हातून शुभ कार्य घडतील. वारसाहक्काचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल.
शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०७.
आज रवि-चंद्र नवमपंचम योगात आपण केलेल्या कामाची सुरुवात चांगली होईल. कष्टाने का होईना जूनी येणी वसूल होतील. त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक प्रगतीच्या नवीन व संधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. अल्पकालीन गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०२, ०६.
आज विषयोगात योगात तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. पैसा खर्च करण्यातही लहरीपणा जाणवेल. कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. आखलेले योजना काही वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पर्धकांवर मात कराल. आपल्या योजना आज सफल होणार आहेत. सर्वच बाबतीत समाधान लाभेल. मनाप्रमाणे घटना घडतील. मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. व्यवसायात उत्तम लाभ होतील. घरातील आनंदी वातावरण मानसिक सौख्य देणारं असेल. गुढशास्त्राची आवड निर्माण होतील.
शुभरंग: नारंगी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्र अनिष्ट योगात आहे. घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहिले तरी तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास गोष्टी टोकापर्यंत जाणार नाही. आपणास प्रतिकुल फले मिळण्याची शक्यता आहे. कितीही स्पर्धांना संकटांना तोंड द्यावे लागले तरी मन:शांती ढळू देऊ नका. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. बोलघेवडेपणा शक्यतो टाळा. अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.
शुभरंग: केशरी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.