शास्त्रानुसार आज विविध योग घटित होत आहेत. शशी योगासोबतच आज, शोभन योग आणि कृतिका नक्षत्राचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या हालचालींचा परिणाम राशीचक्रातील सर्वच राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक स्वरुपात दिसून येणार आहे. या सर्व बदलांचा परिणाम सिंह,कन्या तूळ आणि वृश्चिक राशीवर कसा होणार आहे ते जाणून घेऊया.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य पार पडेल. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. कोणत्याही व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. लग्न करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण उत्साही असेल.
शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. दैनंदिन कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात योग्य वेळी करण्याने लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. नोकरी व्यापारात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील.कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. अन्यथा नुकसान होऊ शकते. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे नातेसंबंध सुधारतील.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.
तूळ राशीतील लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. दिवसभर आनंदाच्या वार्ता कानावर पडतील. त्यामुळे उत्साह वाढेल. नोकरीत महत्वाची जबाबदारी मिळेल. घरातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी लागण्याची शक्यता आहे. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. कामानिमित्त परदेशी प्रवास करण्याचा योग येईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेल्या आर्थिक योजना सफल होतील. नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत गोडवा वाढेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०९.
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस विविध घडामोडींचा असणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला आणि त्यांचे वर्चस्व मान्य करावे लागेल. कुटुंबातील सदस्यांवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. तुमच्या धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग जुळून येतील. आर्थिक देवाणघेवाण करणे टाळावे. तसेच आर्थिक गुंतवणूक करणेसुद्धा टाळावे. घरातील सदस्यांचे आपापसांत मतभेद होतील. त्यामुळे वातावरण थोडे तणावात्मक राहील.
शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०३, ०६.
संबंधित बातम्या