मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : कन्या राशीला मिळणार जोडीदार निवडण्याची संधी! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : कन्या राशीला मिळणार जोडीदार निवडण्याची संधी! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jun 09, 2024 10:11 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 9 June 2024 : सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

आज जोतिषशास्त्रानुसार ज्येष्ठ महिन्याचा पहिला रविवार आहे. सोबतच आज ज्येष्ठ महिन्याची तृतीया तिथी आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या हालचालींमध्ये आज ध्रुव योग आणि वृद्धी योगाची निर्मिती होत आहे. या योगांमध्ये रविवारचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा जाणार ते जाणून घेऊया.

सिंह

व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहार करताना पैसे गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.

कन्या

विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांना आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्रमैत्रिणी तुम्हाला पुन्हा भेटणार आहेत. नवीन वाहन घर घेण्याचा योग आहे. तुम्ही याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.

तूळ

अती संवेदनशील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार करीत रहाल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना काळ अनुकूलच आहे. कर्जाची परत फेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारासोबत आणि कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहेत. तुमचे आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक

राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे सफल होतील. नवीन धोरण योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०३, ०६.

WhatsApp channel