बहुतांश लोक दिवसाची सुरुवात राशीभविष्य वाचून करतात. ग्रहांच्या स्थान बदलाने अनेक शुभ-अशुभ योग घडून येत असतात. याचा प्रभाव प्रत्येक राशींवर होत असतो. चंद्राच्या संक्रमणामुळे आज चंद्र, शुक्र आणि सूर्यामध्ये त्रिग्रही योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा परिणाम सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीवर कसा होणार हे जाणून घ्या.
राशीचक्रातील पाचवी राशी म्हणून सिंह राशीला ओळखले जाते. आज बुधवारचा दिवस सिंह राशीसाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. काही शुभ वार्ता कानावर पडतील. परंतु क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दूरचे प्रवास शक्यतो टाळा. कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या. अडचणीच्या काळात स्वतःला सकारत्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभरंगः लाल शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०१, ०५.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक ताण वाढविणारा असू शकतो. दिवसभर मन अस्वस्थ राहील. मनामध्ये सतत नकारत्मक विचार येत राहतील. व्यापारात भागीदारासोबत वादविवाद करणे टाळा. अन्यथा मतभेद होण्याची शक्यता आहे. मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. आज तुमच्यावर लक्ष्मीची अवकृपा राहील. लहानसहान कारणानेही मन दुखावेल. आरोग्याच्या समस्या उद्भभवतील. शारीरिक दृष्टीकोनातून मधुमेह, पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपूर्वक वागा. कोणासोबतही बोलताना विचारपूर्वक बोला अथवा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शुभरंग: पोपटी शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०३, ०६.
आज बुधवारचा दिवस तूळ राशीसाठी उत्तम असणार आहे. दिवसभर आत्मविश्वास जाणवेल. समाजासाठी करत असलेल्या कामाबद्दल तुम्हाला बहुमानाबरोबरच प्रसिद्धीही मिळेल. वरिष्ठांना खुश ठेवण्यासाठी धडपड कराल. त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी व्हाल. व्यवसायात योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे तुम्हाला फलदायी ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष दयावे लागेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल.त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.
शुभरंगः गुलाबी शुभदिशाः आग्नेय.शुभअंकः ०२, ०४.
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आयुष्यात आणि व्यवसायात योग्य समतोल साधावा लागणार आहे. कोणत्याही कामात मनासारखे यश मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे चिडचिड होईल. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून पालकांना समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. बेरोजगारांना मनासारखी नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. जोडीदारासोबत संवाद साधून मतभेद संपुष्ठात आणाल. मनमोकळ्या संवादातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०२, ०९.