Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 8 June 2024 : आज शनिवार ८ मे २०२४ रोजी रंभाव्रत आहे. तसेच आज चंद्र प्लूटोसोबत युती करत आहे यातून षडाष्टक योगाची निर्मिती होत आहे. आजच्या षडाष्टक योगात आणि रंभाव्रतमध्ये सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.
आज राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल. स्वत:च्या हिंमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात मोठा आर्थिक फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. आहारावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्यावा. पत्नीकडून कडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल.
शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०७.
तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. व्यापारात व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहिल.मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापासारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. बडेजावपणा मिरवू नका. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल.
शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०५.
नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल.अती भावना प्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मुलाच्या बाबतीत वाजवी पेक्षा जास्तच विचार कराल. कुटुंबातील आपसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत.
शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०३, ०५.
संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहिल. कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यापारीवर्गास मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी जुळून येतील.
शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०८.
संबंधित बातम्या