Sinh Kanya Tula Vrishchik : कन्या राशीच्या लोकांना लाभणार आवडत्या व्यक्तीचा सहवास! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : कन्या राशीच्या लोकांना लाभणार आवडत्या व्यक्तीचा सहवास! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : कन्या राशीच्या लोकांना लाभणार आवडत्या व्यक्तीचा सहवास! वाचा चारही राशींचे भविष्य

Published Jun 07, 2024 10:12 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 7 June 2024 : आज ग्रह-नक्षत्रांच्या स्थानबदलामुळे नवमपंचम योग, शूल योग असे विविध योग जुळून येत आहेत. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

 सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : ग्रह-नक्षत्रांच्या चालींवरुन राशिभविष्याचा अंदाज बांधला जातो. ग्रहांच्या हालचालींमुळे अनेक योग घडून येतात. आजसुद्धा ग्रह-नक्षत्रांच्या स्थानबदलामुळे नवमपंचम योग, शूल योग असे विविध योग जुळून येत आहेत. यामध्ये सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.

सिंह

आज नोकरीत सहकारी लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. बऱ्याच दिवसांनी मित्रमंडळी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक आयुष्यात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी रहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान वाढेल. तुमच्या प्रतिमेस वाव मिळेल. नोकरीत बढ़ती मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी असलेल्या संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल.

शुभरंगः लाल शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०१, ०५.

कन्या

अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आज मार्गी लागतील. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. संवाद वाढेल. आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. कौटुंबिक सामंजस्य राहील. व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे.

शुभरंग: पोपटी शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०३, ०६.

तूळ

तुमच्या मुलांमध्ये चिकाटी आणि जिज्ञासूवृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्यवेळी समज द्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल अशी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी लागेल. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका.

शुभरंग: गुलाबी शुभदिशा: आग्नेय.शुभअंकः ०१, ०८.

वृश्चिक

व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यास वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक घडी बसेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची कास धराल. स्वतःला प्रकाशात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थाचा आधार घ्यावा लागेल. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त अपेक्षा तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांसाठी काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे.

शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०१, ०८.

Whats_app_banner