मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik Rashi Prediction: वृश्चिक राशीच्या कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik Rashi Prediction: वृश्चिक राशीच्या कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 06, 2024 09:35 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 6 May 2024 : आज ६ मे २०२४ सोमवारचा दिवस कसा जाईल? वाचा सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींचं भविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज शुक्र अस्त होणार आहे. शिवरात्रीचा चंद्र मीन राशीतुन व बुधाच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. अशात मेष राशीत बुध आणि शुक्राची युती होऊन विशेष योग जुळून येणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

सिंह

कोणताही निर्णय घेण्यात विलंब झाल्यामुळे हातात आलेली संधी परत जाण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कामात स्थानबदलाची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश, अस्वस्थता जाणवेल.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०५.

कन्या

व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. त्यांच्यासोबत संवाद वाढेल. आणि या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात होऊ शकते. मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामंजस्य राहील. व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग जुळून येत आहे.

शुभरंग: पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६

तूळ

नवीन कल्पनांचा पाठपुरावा कराल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. घरामध्ये सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर थोडासा नियंत्रण ठेवावा लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहेत. आजचा दिवस आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०४, ०७

वृश्चिक

मुलांसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची सुरुवात कराल. स्वतःला प्रसिद्धीत आणायचे असेल तर कोणा मध्यस्थाचा आधार घ्यावा लागेल. कलाकरांना मोठ्या संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये एखादया समारंभाचे नियोजन आखाल. व्यवसायिकांना हा काळ अनुकूल आहे. समाजावर तुमच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे.

शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.

WhatsApp channel