मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम, मिळणार गुड न्यूज! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम, मिळणार गुड न्यूज! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 06, 2024 09:53 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 6 June 2024 : आज धृती योग आणि अहोरात्र चतुष्पाद व किस्तुघ्न करण राहील. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : जोतिषशास्त्रामध्ये आज चंद्र केतूशी नवमपंचम योग निर्माण करत आहे. शिवाय आज धृती योग आणि अहोरात्र चतुष्पाद व किस्तुघ्न करण राहील. या सर्वांमध्ये सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार ते पाहूया.

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. परदेशगमनाच्या संधी येतील. तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतरांना थोडा जाचक ठरणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. स्वतःच्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. कोणत्याही कामात योग्य नियोजन आणि अचूक निर्णय यामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबातदेखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची उत्तम साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातून लाभ होईल.

शुभरंग: लाल, शुभदिशा पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्या

कन्या राशीला आज आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. शुल्लक कारणावरून रागाचा पारा चढल्यामुळे घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी-जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या उदारपणाचा गैरफायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. भावंडांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. व्यापारी वर्गांनी व्यवहार जपुन करावेत.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ

तूळ राशीच्या लोकांनी कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावधगिरी बाळगा. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेशभ्रमणासाठी काळ अनुकुल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक

एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी मनाविरुद्ध तडजोड करावी लागणार आहे. अचानक धनप्राप्तीचा उत्तम संयोग निर्माण होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मनमिळावू राहील. व्यापारी-उद्योजक लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. आज नवनवीन प्रोजेक्ट करण्यासाठी अनुकूल दिनमान राहील.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०६.

WhatsApp channel