मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी विवाह जुळण्याचा शुभ योग! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी विवाह जुळण्याचा शुभ योग! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jun 05, 2024 09:43 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 5 June 2024 : आज चंद्राच्या वृषभ राशीत संक्रमणाने पाच राशींची युती निर्माण झाली आहे. याचा प्रभाव राशीचक्रावरसुद्धा पडत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : ग्रह-नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर आपले स्थान बदलत असतात. या स्थान बदलातून विविध योग जुळून येत असतात. आज चंद्र वृषभ राशीत संक्रमण करत आहे.चंद्राच्या या संक्रमणाने वृषभ राशीत आज रवि, बुध, शुक्र, गुरू आणि हर्शल या पाच ग्रहांची युती तयार झाली आहे. या बुधादित्य योगात आजचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा जाणार ते पाहूया.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा संमिश्र फलदायी असणार आहे. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्याकरिता आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या अंमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी रहिल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाज प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.

शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्या

कन्या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कमाईमध्ये वाढ होण्याचे योग बनतील. तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल. आपल्या धैर्याच्या प्रति सजग राहण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. अनिष्ट चंद्रभ्रमणात मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणीसोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०१, ०४.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आज ज्येष्ठांनी घेतेलेले निर्णय लाभदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. तुम्हाला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचा योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.

शुभरंग: भगवा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील.भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. तुमच्यासमोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येतील. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी तुम्हाला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिकबाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. सतत टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

WhatsApp channel