Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज वरूथिनी एकादशी आहे. चंद्र अहोरात्र कुंभ आणि मीन राशीतुन भ्रमण करणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज रवि-चंद्र योग पाहता घरात किंवा घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्यावा. पत्नीकडून कडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल.
शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०७.
आज अनिष्ट चंद्रगोचर होत असल्याने घरापासून दूर रहाण्याचे प्रसंग येतील. खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लागणार नाही. बडेजावपणा मिरवू नका. व्यापारात व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहिल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल.
शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०५.
आज चंद्राचं आणि चार ग्रहाचं पाठबळ लाभल्याने कामाच्या ठिकाणी उत्तम परस्पर संबंध निर्माण करण्यावर भर द्या. दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल. तेवढे तुम्हाला सहकार्य चांगले मिळणार आहे. आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सत्ताधारी प्रशासन यांच्या कडून सहकार्य लाभेल. सामाजिक स्तरावरील परीवर्तन आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत चिंतीत रहाल.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०३, ०९.
आज चंद्र भ्रमणात आपल्या सहवासात येणाऱ्यांना आनंदी करून जाल. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायलामिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. परंतु नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीच शिखर गाठतील. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.
शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.