मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : ग्रहणयोगात तूळ राशीच्या लोकांना होणार शत्रूंचा त्रास! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : ग्रहणयोगात तूळ राशीच्या लोकांना होणार शत्रूंचा त्रास! वाचा चारही राशींचे भविष्य

May 31, 2024 07:39 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 31 May 2024 : राशीभविष्यात योग आणि तिथीच्या आधारे भविष्य सांगितले जाते. आज शुक्रवार ३१ मे २०२४ रोजी चंद्रदेव केतुशी षडाष्टक योग करीत असून ग्रहणयोग घटीत होत आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : जोतिष शास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांचा आधार घेऊन राशींचे भविष्य ठरवले जाते. ग्रह-नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर आपली जागा बदलत असतात. आणि त्यांच्या या स्थान बदलाने विविध योग जुळून येतात. या योग आणि तिथीच्या आधारे भविष्य सांगितले जाते. आज शुक्रवार ३१ मे २०२४ रोजी चंद्रदेव केतुशी षडाष्टक योग करीत असून ग्रहणयोग घटीत होत आहे. यामध्ये आजचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा जाणार हे जाणून घेऊया.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आज षडाष्टक योगाचा दिवस शुभ असणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. तुमच्या कल्पनांना साथीदारांकडून उत्तम साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन व्यग्र राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने मनाला समाधान मिळेल. पत्नीसौख्य आणि संततीसौख्यही उत्तम असेल. घरामध्ये आनंददायी वातावरण राहिल. स्वभावातील गुणदोष मात्र टाळावेत. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. एकंदरीत आजचे दिनमान उत्तम आहे.

शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्या

कन्या राशीसाठी आज तैतिल करणात दिवस चांगला जाईल. तुमच्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून शुभ वार्ता मिळणार आहे. तुमच्यासाठी अपेक्षीत व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदीपासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०१, ०९.

तूळ

तूळ राशीसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. वरिष्ठ आणि वृद्धांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चंचलपणावर आवर घाला. उद्योगात व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०६, ०९.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. घरामध्ये एकमेकांच्या विचारात तफावत जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.

WhatsApp channel