Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीच्या लोकांनी आज गुंतवणूक करणे टाळा! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीच्या लोकांनी आज गुंतवणूक करणे टाळा! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : सिंह राशीच्या लोकांनी आज गुंतवणूक करणे टाळा! वाचा चारही राशींचे भविष्य

Updated May 30, 2024 09:19 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 30 May 2024 : आज चंद्र कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तत्पूर्वी शनीसुद्धा कुंभ राशीतच विराजमान असणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज ३० मे गुरुवारच्या दिवशी चंद्र कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तत्पूर्वी शनीसुद्धा कुंभ राशीतच विराजमान असणार आहे. शनी आणि चंद्र यांच्या एकत्रित येण्याने आज शनी शश योगाची निर्मिती होत आहे. या योगात आजचा दिवस सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा असणार हे पाहूया.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा तणावात्मक असणार आहे. आज स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. महत्वाच्या कार्यात घाईगडबड योग्य नाही योग्य विचारा अंतीच निर्णय घ्यावेत. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. सरकारी नोकरीत असाल तर वरिष्ठांकडून काहीसा त्रास जाणवेल. व्यापारात उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करणे टाळावे. अथवा मोठी आर्थिक हानी होऊ शकते. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर बारकाईने नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याने मोठ्या समस्या उद्‌भवतील. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी लागेल. हितशत्रुचा त्रास जाणवेल.

शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०१, ०५.

कन्या

कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग आधीपेक्षा जास्त फायद्यात राहतील. तुमच्या कार्यप्रणाली आणि कल्पनाशक्तीत सुधारणा होईल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. शुभ कार्यात सहभागी व्हाल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. दुरवरच्या प्रवासातून लाभ होतील.नवे काही करण्याचा प्रयत्नाला अतोनात यश मिळेल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ

तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. हुशारी आणी उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार आहे. त्यातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या स्वभावातील आळशीवृत्ती मात्र टाळावी. ध्येयापासून विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेल्या योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भावंडाकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

शुभरंग: गुलाबी शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शीपणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम, रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. खेळाडूसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. तरुणवर्गास मनासारखी नोकरी मिळेल. मित्रमैत्रिणीच्या नातेवाईकांच्या सहकार्याने नवीन योजनेवर कार्य कराल. दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काचे प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर आणि मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०३, ०९.

Whats_app_banner