Sinh Kanya Tula Vrishchik : कन्या राशीच्या लोकांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : कन्या राशीच्या लोकांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : कन्या राशीच्या लोकांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका! वाचा चारही राशींचे भविष्य

Published Jun 03, 2024 10:55 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 3 June 2024 : आज सोमवारच्या दिवशी सौभाग्य व शोभन योगाचा प्रभाव राशींवर होणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज उदीत बुध आज अस्त होणार असून, अहोरात्र सौभाग्य व शोभन योग असुन कौलव व तैतील करण आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा जाईल आजचा दिवस. वाचा चारही राशींचे भविष्य!

सिंहः 

आज कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. ऊर्जादायी आणी प्रचंड उत्साहपूर्ण दिवस असेल. महत्वाची कार्य आज नकी पूर्ण करा. स्पर्धा परिक्षा मुलाखती मध्ये यश मिळेल. मागील केलेल्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसायाची सुरवात कराल. हक्काच्या वस्तूंबांबत तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट राहतील. नोकरी व्यवसायात अडलेली कामे पार पडतील. योग्य वेळी समयसूचकता दाखवाल. हजरजबाबीपणामुळे वरिष्ठांची मने जिंकून घ्याल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल. व्यवहारात कोणाशी संगनमत करायचे हे ठरवून आपल्या फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करियरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. 

शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०७, ०९.

कन्याः 

आज एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. मित्रमैत्रिणीत स्नेह वाढेल. इतरावर आपला प्रभाव राहील. आर्थिक बाबतीत अनेक मार्ग लाभतील. परंतु खर्चही वाढल्यामुळे हातात पैसा मात्र रहाणार नाही. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. तुमच्यातील कलाकार लोकांना जाणवेल घरामध्ये बुद्धी आणि व्यवहार यांची सांगड योग्य तऱ्हेने घालावी लागेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. 

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ: 

आज आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. यामुळे ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल. आळसीवृत्ती टाळावी. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्ती मध्ये नविन समस्या उद्‌भवतील. अचानक संकट येण्याची संभावना आहे. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. तुम्हाला वादामधुन नुकसान सहन करावे लागेल. निर्णय घेताना स्वतःच संभ्रमात पडाल. नको त्या गोष्टींवर खल करत बसाल आणि हातात मात्र काहीच पडणार नाही. करियरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. यंत्रावर काम करणारांनी अवश्य काळजी घ्यावी. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. आपणास काहीस त्रासदायक ठरणार आहे. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. 

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आजचं नोकरदार नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचबरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. कलाकरांना अनेक संधी दार ठोठावतील. परदेशगमनाचे योग संभवतात. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत मोजकेच काम करा पण ते बिनचूक असल्याची खात्री करा. पैशाबाबत काटेकोर राहाल आणि इतरांनीही तसे रहावे अशी तुमची इच्छा असेल. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.

Whats_app_banner