Sinh Kanya Tula Vrishchik : वृश्चिक राशीच्या लोकांनी आज मानसिक स्वास्थ्य जपावे! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Sinh Kanya Tula Vrishchik : वृश्चिक राशीच्या लोकांनी आज मानसिक स्वास्थ्य जपावे! वाचा चारही राशींचे भविष्य

Sinh Kanya Tula Vrishchik : वृश्चिक राशीच्या लोकांनी आज मानसिक स्वास्थ्य जपावे! वाचा चारही राशींचे भविष्य

May 29, 2024 10:09 AM IST

Leo, Virgo, Libra, Scorpio rashi prediction 29 May 2024 : आज बुधवार २९ मे २०२४ रोजी इंद्र योग आणि विष्टी योगाची निर्मिती होत आहे. याचा प्रभाव राशींवरसुद्धा पडणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक चारही राशींसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य.

सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक
सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक

Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : जोतिषशास्त्रानुसार आज ज्येष्ठ पक्षाची षष्ठी तिथी आहे. आज चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत भ्रमण करत आहे. तसेच आज इंद्र योग आणि विष्टी योगाची निर्मिती होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या स्थान बदलादरम्यान सिंह,तूळ, कन्या आणि वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते या युक्तीचा प्रत्यय येईल. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदयकारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची उत्तम साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ मिळाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल.

शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्या

कन्या राशीसाठी आजचा दिवस चढ-उत्तरांचा असणार आहे. चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. आणि याची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सावकाश चालवा.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

तूळ

तूळ राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्यरितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी लाभदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. महत्वाच्या कार्यात अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्यत पत्नीची पूर्ण साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात चांगला लाभ होईल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०१, ०८.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. एखाद्या कामात इतरांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मानअपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

Whats_app_banner