Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज चंद्र शुक्राशी संयोग होत असुन राजयोग घटित होणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज शुक्राच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात आपणास शुभअशुभ अशी समिश्र स्वरुपाची फळे मिळतील. अनिष्ट चंद्र भ्रमणात मनातील संयशावृती वाढेल. कडक बोलण्या मुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. तुमचा मुड कधी जाईल. आणि कधी चिडाल याचा भरवसा राहणार नाही. मुलांच्या कल्पनांमुळे चक्रावून जाल भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा.
शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.
आज सिद्ध योगात आपणास आर्थिक लाभ होईल. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. बौद्धीक गोष्टींकडे ओढा राहील. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे.प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.
आज शुभ स्थानातील चंद्रभ्रमणात वृद्धी होईल. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्या मुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०६, ०९.
आज अनपेक्षित फळे मिळण्याची शक्यता आहे. चंद्रभ्रमण हे अशुभ स्थानातून होत आहे. कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या.
शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०२, ०८.